प्रेम करावे,

प्रेम करावे,

कुणी,कुणासोबत,कुठ ,केंव्हा,कसे ??
हे ज्याचे त्याने ठरवावे ,
पण, प्रेम करावे.
ज्याचे हृदय मधाळ असेल,
नयनी इंद्रधनु उगविला असेल,
कानांत दूर कुठून तरी साद ऐकु आली असेल,
मन ‘मोहन’ झाले असेल,
स्वभावात लोणी असेल,
दिवस रंगीन अन रात्र मोरपंखी असेल,
…..जो सर्वस्व उधळण्यास उतावीळ असेल-
…………….-प्रेम,त्यानेच करावे.
ज्या डोळ्यांत गुलाबी वादळ असतील,
पापण्यात सोनेरी स्वप्न असतील,
ओठावर गोड स्मित असेल,
मन नेहमीच ,राधे सारखे बेधुंद असेल,
कोवळ्या कल्पने ला पंख फुटले असेल,
हृदयात खोल पर्यंत ओलावा असेल,
…ज्यास “प्रेम” समजते-
…………..-प्रेम, त्यालाच करावे.
बागेत,फुलझाडा च्या मागे,
नदीत किंवा किनारीवर,वाळवंटात ,
पर्वताच्या पायथ्याशी वां टोकावर,
घरात,वरांड्यात,पायरीत,गच्चीवर,
रस्त्यावर,कालेजात,मंदिरात,
बस स्टे ण्ड ,रेल्वे स्टेशन,एयरपोर्टवर,
कोर्टरूम,बाजार,दुकान,मेळा,
कुठहि,जेथे सोयीस्कर वाटेल,
….अन,कोणास अडचण न हो-
……………-प्रेम, तेथेच करावे.
सकाळ,दुपार,सायंकाळ,रात्र,
जेंव्हा कधी वेळ मिळो- थोडा जरी,
जेंव्हा मन प्रसन्न असो,
किवां,कधी मन उदास असो,
उजेडांत,अंधारात,धूसर-प्रकाशात,
वादळी वाऱ्यात,नाचणाऱ्या श्रावणात,
उकड्त्या गर्मीत,गोठ्विणाऱ्या गारठ्यात ,
…जेंव्हा,इच्छेला भरभरून प्रतिसाद मिळे-
…………..-प्रेम,तेंव्हाच करावे.
जसे,राधेने …, मीराने केले,
गोकुल्यातल्या गोपांनी केले,
प्रकृती ने चैतन्याशी केले,
शिवाने शक्तीशी,कृष्णाने मुरळीशी केले,
इंद्र्धनु ने सप्तरंगाशी , संगीताने सप्तसुराशी,
मनु ने श्रद्धेशी ,
अन,मी तुझ्याशी केले-
…………….प्रेम असे करावे.
प्रेम- जसे जमेल,
प्रेम- जेंव्हा जमेल,
प्रेम- जेथे जमेल,
प्रेम- ज्या कुणाशी जमेल,
पण,जमेल,तरच करावे,
कसे,केव्हा,कुठे,कुणासोबत-
हे ज्याचे त्याने ठरवावे,
पण, ……….प्रेम करावे.

Posted in Uncategorized | Leave a comment

हजारो…

हजारो तोतया चेहर्‍यांमधुन
तुझा चेहरा मी निवडला
वाटला खरा असेल,
पण तो ही शेवटी फसवा
मुखवटाच निघाला

Aside | Posted on by | Leave a comment

काही चारोळ्या आणि काही ओव्या

नमस्कार कवी मित्रांनो , मी काही कवी नाही पण या कम्युनिटीवर आल्यानंतर थोडंफार लिहायची सवय लागली …. मी जरी कवी नसलो तरी एक रसिक वाचक आहे .इथे इतक्या उत्कृष्ट कविता असतात की प्रतिसाद दिल्याशिवाय राहवलं नाही . त्याच प्रतिसादाच्या काही चारोळ्या आणि काही ओव्या एकत्रित इथे टाकत आहे 
तुझं आभाळाचं देणं आणि चारोळ्या – तिच्या आठवणीच्या या धाग्यावरील या काही रचना आहेत ..

नसताच अर्थ
मुळी जगण्याला
तुजविण सखे
व्यर्थ भासे||

भास सारखाच
क्षणोक्षणी होतो
आणि हरवतो
तुझ्या रंगी||

Posted in Uncategorized | Leave a comment

का गेलीस ग सोडून

का गेलीस ग सोडून एकट्याला 
स्वप्न दाखवून ह्या वेड्या जीवाला?

रंग होते तितके पुरेसे होते मला 
का इंद्र धनुष्य दाखवलेस मला

चिखलात रुतून पडलेला काय वाईट होतो 
का त्यातून तू बाहेर काढलेस मला ??

काय चुकले माझे कळले नाही माझेच मला 
काही कळण्या आधीच का तू सोडून गेलीस ग मला??????????

Posted in Uncategorized | Leave a comment

शंकराची महानंदा

मी तीला ओळखत पण नव्हतो
पण ती माझ्यावर पहील्या नजरेतच
फीदा झाली,
आणी माझ्याबरोबर अर्थगर्भासाठी
ध्यान करायला ही तयार झाली,
तीला मी पहील्या नजरेतच ओळखले
ती इतर सुहासीनींसारखीच होती,
मी तीच्याशी एकरूप झालो आणी
ध्यानाच्या पहील्या बैठकीतच
ती मला उमगली,
तीच्या आईचा भास् मला तिच्यात झाला
अलंकारांनी आणी अभुषणांनी नटलेली ती
कधी नाजुक सहज वाटणारे तीचे हास्य
गूढ़ वाटायचे आणी बदलून जायचे
सुख्दुखंच्या अश्रुंमध्ये,
जे मला समजू लागले,
मी तीला ऐकू लागलो,
आणी कीतीतरी गुपीते मला समजली
मोठ्या लोकांची,
जे शौकीन होते चंद्राच्या अभेचे,
तीचे मला पहीलेच ध्यान इतकी भावले
की मी परत ध्यानाला बसलोच नाही,
आज काल ती माझ्या बरोबर असते
शंकराच्या महानंदेसारखी

Posted in Uncategorized | Leave a comment

कस सांगू मी ह्या जगाला

कस सांगू मी ह्या जगाला कि तू माझ्यासाठी काय होते ,
तुझ्या डोळ्यातून अश्रू पडताना माझे डोळेही भिजून जाते …

कस सांगू मी ह्या जगाला कि तुझे माझे नाते काय होते ,
आपलं नांत तर, नातांच्या अंधकारातून निघणारी एक ज्योत होते ..

कस सांगू मी ह्या जगाला कि तू माझे सर्वस्व आहे ,
तुझ्या विना मी तर एक न चकाकणार चांदण आहे …

कस सांगू मी ह्या जगाला कि तू माझे काय होते ,
तुझ्याविना तर माझी कविता हि पूर्ण होवून अपूर्ण होते …

कस संगु रे शोन्य कि तुचं माझे जीव कि प्राण होते …

कस सांगू ग मी ह्या जगाला … 
कारण सांगण्यासाठी हे अमूल्य शब्द हि अपुरे होते …

कस सांगू …

Posted in Uncategorized | Leave a comment

***** आजची वात्रटिका ****

हिची चाल तुरू तुरू

जीवनावश्यक वस्तुंमध्ये
महागाई चढाओढ लावू लागली.
तुरीची डाळही
पुन्हा तुरू तुरू धावू लागली.

महागाईचे दु:ख असे
घासा-घासाला गिळावे लागते!
डाळ शिजली नाही तरी
पापी पोटाला जाळावे लागते !!

Posted in Uncategorized | Leave a comment